




खान्देश मराठा शुभ विवाह


नमस्कार ....!!!
उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, धुळे व नंदुरबार हे चार जिल्हे येतात यालाच आपण खान्देश म्हणतो... खान्देशचा ईतिहास, तेथील संस्कृती आणि वारसा आपणा सर्वांना माहिती आहेच. प्रामुख्याने शेती व्यवसाय करणारा हा खान्देशी बांधव नौकरी व्यवसाया निमित्त आपले गाव सोडुन ईतरत्र स्थायीक झाला.
जशी-जशी ही लोकं दूर गेली तशी-तशी त्यांची नाती देखील हळू-हळू विरळ होत गेलीत. कितीही दूर गेला तरी आपली संस्कृती, सण, उत्सव जपणारा, सुरुवातीला वर्षातून चार - पाच वेळेस गावी येणारा हा आपला बांधव नौकरी, व्यवसायामुळे कालांतराने फक्त सुख आणि दुःखालाच गावी येतोय. परंतु तो कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी त्याला त्याच्या मातीची ओढ असतेच. म्हणुन जरी आपला मराठा समाज सर्वदुर व खूप मोठा असला तरी तो आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे लग्न आपल्याच मायभूमीतील व्यक्ती सोबत लावण्यास प्रथम प्राधान्य देतो...
परंतु सध्याच्या धावपळीच्या युगात लग्न जमविण्यासाठी अनेक अडचणी येतात आणि आपल्याला अपेक्षीत सुयोग्य वधू किंवा वर मिळत नाही. कधी-कधी तो आपल्या शेजारीच असतो. परंतु परिचय व संपर्क नसल्यामुळे आपण तिथं पर्यंत पोहचत नाही व नंतर आपल्या लक्षात येते की आपण योग्य स्थळ गमावले...
म्हणुन लग्न जमविण्यासाठी येणाऱ्या अनंत अडचणींचा अभ्यास करून आम्ही "खान्देश मराठा शुभ विवाह डॉट कॉम" हे अँप आपल्या पर्यंत पोहचवत आहोत...
जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार ह्या जिल्ह्यांमध्ये मूळ गाव असणाऱ्या व्यक्तींनीच यात नोंदणी करावी किंवा खान्देशाशी काही नाते संबंध असल्यास किंवा जे नव्याने नाते संबंध जोडू ईच्छितात अशाच व्यक्तींनी या मध्ये नोंदणी करावी....
नोंदणी करतांना विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी, जेणे करून समोरच्या व्यक्तीला आपला यथायोग्य परिचय होईल... यामाध्यमातून आपल्याला सर्व क्षेत्रातील सुयोग्य वधू- वर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे...
नोंदणी केल्यानंतर आपले लग्न जुळल्यास कृपया तशी सूचना येथे करावी म्हणजे येथून आपली नोंदणी रद्द करता येईल..
धन्यवाद ....!!!!
प्रस्तावना


मोफत नोंदणी करा
अथवा
ह्या 9423692211
क्रमांकावर उमेदवाराचा
फोटो व बायोडाटा
व्हॉटसअप करा
आम्ही तुमची नोंदणी करू
व्हाट्सअप करण्याकरिता वरील आयकॉन वर क्लिक करा
आपले लग्न जुळल्यास कृपया आम्हाला ह्या 9423692211 क्रमांकावर सूचना द्यावी जेणे करून यादीतून आपले नाव वगळण्यात येईल
आपण उमेदवाराचे एका पेक्षा अधिक फोटो अपलोड करू शकता


